राज्याच्या महावितरण विभागात १०० कोटींचा घोटाळा!

Foto
मुंबई : राज्याच्या महावितरण विभागात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून हा घोटाळा झाल्याचे उघड झालं आहे. २०२४ ते २०२६ दरम्यान ओम एस सीजेआर लामाट व्हिया प्रोजेक्ट कंपनीने महावितरणची १०० कोटींची फसवणूक केली. कंपनीच्या संचालकांवर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक भावेशकुमार पटेल, हिरेनकुमार कनानी आणि हितेशभाई राविया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत महावितरणाचा गंभीर आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनुसार, २०२४ ते  जानेवारी २०२६ दरम्यान  मे. ओम यश सी.जे.आर. लामाट विया प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक भावेशकुमार अश्विनभाई पटेल, हितेशभाई आणि हिरेनकुमार लावजीभाई कनानी यांनी संगनमताने ९९ कोटी ५० लाख रुपयांची बनावट बँक गॅरंटी तयार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडिया, जुनागड शाखा (गुजरात) यांच्या नावाची बनावट बँक गॅरंटी तयार करून त्यावर एसबीआयचा बनावट ई-मेल वापरल्याचे तपासात समोर आले आहे.