बिबट्या - मानव संघर्षांवर लघुनाटिका सादर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): सध्या राज्यभर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्या व मानव हा संघर्ष शिगेला पोचला आहे. अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व शासनाच्या मानव वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य डॉ. संतोष पाटील वनजागर या उपक्रमाद्वारे याबाबत सातत्याने जनजागृती करत असतात. कालही त्यांनी लिहिलेल्या कुणी घर देता का घर या लघु नाटिकेचे ज्ञानदीप माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात सादरीकरण करण्यात आले.

शाळेतील ५ मुले व स्वतः डॉ. पाटील यांनी हे प्रभावी सादरीकरण केले. कुणी घर देता का घर ही साद घालत अधिवास हरवलेला, हातात पिंजरा घेत जंगलाकडे घुसणाऱ्या माणसालाच कोंडण्याच्या तयारीत असणारा बिबट्या सर्वांनाच भावला. बिबट्यापासून कसे संरक्षण करावे यावर प्रबोधन करण्यात
आले. 

संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव गवळी, मुख्याध्यापिका वंदना दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिकचे मुख्याध्यापक सतीश बडक, सहशिक्षक काकासाहेब वाढेकर, अस्लम तडवी, गोकुळ सिनकर, संगीता बोर्ड, गणेश व्यवहारे, विश्वनाथ लुटे, अर्चना देशपांडे, संगीता वाकडे, संगीता बोर्डे, विजय चापे, सुनील दुसाने आदींनी परिश्रम घेतले.