भक्ती, संस्कार आणि आशीर्वादाची पवित्र परंपरा जपणारे जागृत देवस्थान

Foto
जय माता दी...
मातृभक्तीतून साकारलेले श्रद्धास्थान रेणुकामाता मंदिर
उज्ज्वला साळुंके
O सतीष वैद्य आणि रेणुकादास वैद्य यांनी आपल्या पूज्य मातोश्री प्रेमलाबाई वैद्य यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ या मंदिराची उभारणी केली. आज हे मंदिर परिसरातील हजारो भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे केंद्र बनले आहे.
मातोश्री प्रेमलाबाई वैद्य या श्री रेणुकामातेच्या निस्सीम भक्त होत्या. घरची परिस्थिती सर्वसाधारण असतानाही त्यांची देवीवरील श्रद्धा अढळ होती. त्या दररोज घरीच देवीची उपासना, आराधना, जप-जाप्य आणि पूजाअर्चा करीत असत. तसेच नित्यनेम ाने मासिक व वार्षिक माहूर यात्राही करीत असत.
त्यांच्या जीवनात भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व होते. मुलांवर उत्तम संस्कार करणे, त्यांना श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि धार्मिक आचरणाची शिकवण देणे, हीच त्यांची जीवनपद्धती होती. रेणुकाम तेिवरील त्यांची निष्ठा आणि अखंड उपासना हेच त्यांच्या कुटुंबाच्या जीवनातील आध्यात्मिक बळ होते. २००२ मध्ये दोन्ही पुत्रांना मातृवियोगाचा दुःखद प्रसंग सहन करावा लागला. मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती आणि त्यांनी दिलेले संस्कार दोन्ही पुत्रांच्या मनात सदैव जागृत होते. मातोश्रींच्या निधनानंतर वर्षश्राद्ध होण्यापूर्वी सतीष वैद्य यांच्या स्वप्नात मातोश्री प्रेमलाबाई वैद्य आल्या आणि त्यांनी मंदिर उभारण्याची आज्ञा दिली, अशी कुटुंबीयांची श्रद्धा आहे. मातृभक्त असलेल्या दोन्ही पुत्रांनी या स्वप्नाला मातोश्रींचा आशीर्वाद आणि प्रेरणा मानून मंदिर उभारण्याचा संकल्प केला.
सामूहिक भक्ती अन् धार्मिक संस्कारांचे केंद्र मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ धार्मिक विधी होत नाहीत,
तर सामूहिक भक्ती आणि संस्कारांची परंपराही जोपासली जाते. सोसायटीतील महिला दररोज संध्याकाळी एकत्र येऊन रामरक्षा, हनुम ान चालीसा, रेणुका स्तोत्र, आरती आणि भजन करतात. या नियमित उपासनेमुळे परिसरात भक्तीभाव, एकोपा आणि धार्मिक संस्कारांची जपणूक होत आहे. विशेषतः शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. विविध धार्मिक कार्यक्रम, देवीची आराधना, सामूहिक प्रार्थना आणि यज्ञयाग यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. त्यामुळे हे मंदिर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन धार्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. श्री रेणुकामाता मंदिरातील धार्मिक विधी आणि दैनंदिन पूजाअर्चे ची जबाबदारी वेदमूर्ती महेश भास्करराव जोशी गुरुजी पार पाडतात. मंदिरातील पूजा, धार्मिक अनुष्ठाने आणि विविध उत्सव शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न व्हावेत, यासाठी ते सेवा देतात. मंदिराचे पुजारी म्हणून त्यांच्या निवासाची आणि मानधनाची जबाबदारी सतीष वैद्य सांभाळतात. मंदिरातील धार्मिक परंपरा अखंड सुरू राहाव्यात, यासाठी वैद्य कुटुंबीयांकडून दिले जाणारे हे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions