धावत्या स्मार्ट सिटी बसचे चाक निखळले; दुचाकीला धडकल्याने एकजण गंभीर जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): स्मार्ट सिटी बसच्या दुखस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार सोमवारी (७ सप्टेंबर) उघडकीस आला. वेरूळहून शहराकडे येणाऱ्या धावत्या स्मार्ट सिटी बसचे समोरचे उजवे चाक दौलताबाद घाटात अचानक निखळून थेट एका दुचाकीस्वाराला धडकले. 

या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, मनपाच्या बसेसच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नदीम नजीर शेख (४९, रा. जहांगीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर) असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वेरूळहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवाशांना घेऊन येणारी मनपाची स्मार्ट सिटी बस दौलताबाद घाटातून जात होती.

गाडी वेगात असताना अचानक बसचे समोरचे उजव्या बाजूचे चाक निखळून बाहेर आले. याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नदीम शेख यांच्या दुचाकीला या चाकाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, नदीम शेख हे दुचाकीसह खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन खंडागळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत आहे. अपघाताची नोंद करण्यात आली.

-- सिटी बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर -- 
काही दिवसांपूर्वीच आमखास मैदानाजवळ एका स्मार्ट सिटी बसचा पाटा तुटल्याने जखमीवर घाटीत उपचार सुरू रुग्णालयाच्या भिंतीला जवळ जाऊन थांबली होती. आता धावत्या बसचे चाक निखळल्याने स्मार्ट सिटी बसेसच्या देखभाल -दुरुस्तीची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. प्रवाशांचा जीव या बसेसमध्ये खरेच सुरक्षित आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.