वैजापूर येथील एका तरुणाचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू
वैजापूर, (प्रतिनिधी): येथील स्टेशन रोड रस्त्यावरील बनकर वस्ती येथे झाडाची फांदी तोडत असताना ३२ केवी विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने वैजापूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. शरद हरिभाऊ बनकर (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. शरद बनकर हे शनिवारी सकाळी आपल्या घरासमोरील झाडाची फांदी तोडत असताना त्यांचा स्पर्श तिथून जाणाऱ्या ३२ केवी वाहिनीला झाल्याने व ते खाली पडले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची वैजापूर पोलीस स्टेशन येथे नोंद घेण्यात आली आहे















