पैठणच्या नागघाटावर ऋषिपंचमी साजरी करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : दक्षिण काशीतील जुन्या पैठण मधील प्रसिद्ध नागघाटावर भाद्रपद शुद्ध चतुर्थी शुभ
पर्वावर मंगळवारी ऋषीपंचमी साजरी करण्यासाठी रुढी, परंपरा, प्रथेप्रमाणे हजारो भाविक महिलांनी गर्दी केली
होती.
नागघाटावरील इंद्रेश्वर, नागेश्वर तीर्थावर भल्या पहाटेपासून महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती त्रेतायुगात दक्षिणकाशीच्या पैठण परिसरात शेकडो ऋषी, मुनी, आचार्य, महामंडळेश्वर, जपी, तपी या महापुरुषांचे वास्तव होते. त्यांच्या दर्शनासाठी भाविक येत असेत पुरोहितांच्या मंत्र उच्चारात ऋषीमुनींच्या प्रतिमेचे पूजा करून मराठवाड्यातून आलेल्या महिलांनी नागघाटावर ऋषी पंचमी उत्सव साजरा केला.