दिवाळीसाठी नवे कपडे खरेदीसाठी आजोबांसोबत निघालेल्या नातीचा भाऊ आणि आजोबांसह अपघातात मृत्यू

Foto
बीड: दिवाळीसाठीचे नवे कपडे घेण्याआधी चिमुकलीवर काळाने घाला घातला. एका भीषण अपघातात चिमुकलीसोबत तिचे आजोबा आणि त्यांचे भाऊदेखील ठार झाले आहेत. या घटने आष्टी तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. एका कारने दिलेल्या धडकेत ऐन दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. मिरजगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या लहान नातीचा समावेश असून, या दुर्घटनेमुळे केळसांगवी गावात शोककळा पसरली आहे.

मृत्यू झालेल्यांची नावे सुदाम पडोळे, देविदास पडोळे आणि श्रेया पडोळे अशी आहेत. केळसांगवी येथील शेतकरी सुदाम पडोळे हे आपला शेतातील कापूस जिनिंगमध्ये विकण्यासाठी आपल्या भावासोबत गेले होते. दरम्यान, दिवाळी किंवा सणासाठी नवीन कपडे खरेदी करावेत, या अपेक्षेने त्यांची लाडकी नात श्रेया हीसुद्धा त्यांच्यासोबत दुचाकीवर गेली होती.

या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे पडोळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, दोन भाऊ आणि एका चिमुकल्या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.