दावत-ए-इफ्तारमधून बंधुभावाचा संदेश

Foto
पवित्र रमजान महिन्यानिमित्त
बिडकीन, (प्रतिनिधी ) शुक्रवारी सायंकाली मदिना मस्जिद समोर, बसस्टैंड परिसरात ङ्गङ्खदावत-ए-इफ्तार पाटीचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला हिंदू-मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामुदायिक ऐक्याचे दर्शन घडविले. उपस्थितांनी एकत्र येत रोजा सोडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आयोजक नगरसेवक सागर फरताळे व ऋतिक धर्मे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अशोक धर्मे, उपसरपंच किरण गुजर, विकास गोर्डे, तमीज इनामदार, अविनाश राठोड, अयूब शेठ खान, मोहन हिवाळे आदी उपस्थित होते.