ज्ञान-परंपरेचे रक्षण करण्यात अपयशी ठरणार्‍या देशाचा विनाश होतो... : अमित शाह

Foto
मुंबई : जो देश आपल्या ज्ञान-परंपरेचे रक्षण करण्यात अपयशी ठरतोतो देश कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा विनाश व्हायला फारसा वेळ लागत नाही. याउलट, जो देश या मूल्यांचे जतन करतो, त्याला दीर्घकाळ गुलामगिरीत राहावे लागले तरीही पूर्णपणे गुलाम बनवता येत नाही. भारत हे याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच, त्यांनी नमूद केले की, जरी नालंदा विद्यापीठ जाळून नष्ट केले जाऊ शकत असले, तरी लोकांच्या मनात आणि हृदयात वसलेले ज्ञान कोणीही नष्ट करू शकत नाही, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. 

मुंबईच्या फोर्टमधील दी एशियाटिक सोयायटीला अमित शहा यांनी भेट दिली. त्यानंतर एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच भारतीय ज्ञान परंपरेवरही भाष्य केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच मी गृहमंत्री नात्याने नव्हे, तर आंदोलक म्हणून आल्याचे अमित शहा यांनी सांगितले. ङ्गअनेकांनी प्रयत्न केले. नालंदाचं ग्रंथालय जाळले, त्यावेळी महिनाभर धूर निघत होता. नालंदा जाळू शकतात, पण लोकांचं ज्ञान जाळू शकत नाही. आज एशियाटिक सोसायटीच्या इतिहासावर भाष्य करणार नाही. हा जुना इतिहास आहे. आपला पराभव होतो, त्यावेळी पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. जेव्हा विजय मिळवतो, त्यावेळी ज्यांच्यावर विजय मिळवतो, त्यांच्या स्मृती नष्ट न करता त्यांना आपल्या कार्यात जोडण्याचा प्रयत्न करतो. खर्‍या ज्ञानाला कोणती विचारधारा बंदिस्त करू शकत नाही. तुमची एखादी विचारधारा असेल, तर तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने बदलू शकता. ज्ञान मुक्त असायला हवं. एशियाटिक सोसायटी कोणी बनवली, कधी बनवली आणि कोणत्या उद्देशासाठी बनवली, याचा विचार करण्यापेक्षा इथे असलेल्या ज्ञान भंडाराचा उपयोग हा भारताला महान कसं करता येईल, याचा विचार केला पाहिजे. त्या दिशेने पुढे गेले पाहिजे. मी स्पष्ट सांगतो की,भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश विश्व कल्याणाचा आहे. परंतु त्यांचा उद्धेश तसा नव्हता. त्यांचा उद्देश हा अनेक वर्ष लोकांवर शासन करण्याचा होता, असे त्यांनी पुढे सांगितले.

गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या दौर्‍यासाठी मुंबईत आले आहेत. या दौर्‍यादरम्यान ते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त, ते हिंदी भाषेवर केंद्रित असलेल्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात सहभागी होतील. शहा एशियाटिक सोसायटीमध्ये श्री गणेश ध्यानार्थी या हस्तलिखितांच्या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.

एशियाटिक सोसायटीमधील कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, मी जेव्हा एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत प्रवेश करत होतो, तेव्हा विनय-जी यांनी नमूद केले की, एखाद्या गृहमंत्र्यांनी एशियाटिक सोसायटीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, मी येथे गृहमंत्री या नात्याने आलेलो नाही. भारतीय ज्ञान-परंपरेचे जतन करण्याच्या चळवळीतजी हजारो वर्षांपासून चालत आली आहे एक सहभागी म्हणून मी येथे आलो आहे. माझा ठाम विश्वास आहे की, आगामी काळात मुंबईची एशियाटिक सोसायटी या ज्ञान-परंपरेची मशाल वाहक म्हणून काम करेल आणि ती परंपरा देशभर पोहोचवण्यास मदत करेल.

ते ग्रंथालयाची पाहणीही करतील. एशियाटिक सोसायटीच्या हस्तलिखित जतन प्रयोगशाळेच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील. याव्यतिरिक्त, शहा वांद्रे येथील जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर, उद्या म्हणजेच सोमवारी, केंद्रीय गृहमंत्री नवी मुंबईतील वाशी येथील सिडको () प्रदर्शन केंद्रात हिंदी भाषेवर केंद्रित असलेल्या राजभाषा संमेलनात सहभागी होतील. तसेच, ते लालबागचा राजाचे दर्शन घेऊन प्रार्थना करतील.