पिन पोटात अन् खोबऱ्याचा तुकडा अडकला गळ्यात

Foto
घाटीतील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्याचे उत्तम उदाहरण देत दोन वेगवेगळ्या आणि धोकादायक घटनांमधून दोघांचे प्राण वाचवले आहेत. दातात धरलेली धारदार स्कार्फपिन पोटात जाऊन थेट फुप्फुसात अडकलेल्या एका १२ वर्षीय मुलीवर, तसेच घशात खोबऱ्याचा तुकडा अडकलेल्या दोनवर्षीय बालकावर घाटीत उपचार करण्यात आले. अत्याधुनिक 'ब्रोन्कोस्कोपी' तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टरांनी या दोन्ही रुग्णांच्या शरीरातून पदार्थ यशस्वीरीत्या बाहेर काढत त्यांना जीवदान दिले.
बारावर्षीय मुलीच्या पोटात रविवारी (दि.२५) सायंकाळी साडेतीन इंचांची स्कार्फपिन गेली. ती डाव्या फुप्फुसात अडकल्याने मुलीला दम लागण्यास सुरुवात झाली. खासगी रुग्णालयात उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी तिला सोमवारी पहाटे तीनला घाटीत
दाखल केले.
कान-नाक-घसा विभागातील डॉ. प्रत्युषा यांनी विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांना माहिती दिली. क्ष-किरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर आणि डॉ. अजय वरे यांनी सीटी स्कॅन करून पिन अडकल्याचे निदान केले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपचारांत डॉ. प्रशांत केचे, डॉ. सोनाली जटाळे, डॉ. अदीब हुसेन, बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर आणि भूलतज्ज्ञ गणेश निकम यांनी सहकार्य केले.
सतत खोकला आणि दम
मुलीने महिनाभरापूर्वी खोबऱ्याचा तुकडा गिळला होता. तेव्हापासून त्याला सतत खोकला आणि दम लागत होता. घाटीत दाखल केल्यानंतर तपासणी करून उपचार करण्यात आले. ब्रोन्कोस्कोपीद्वारे अडकलेला तुकडा काढण्यात आला. आता त्याची प्रकृती ठणठणीत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions