आंदोलकांवर जवानाने पॅलेट गनच्या ७ गोळ्या झाडल्या

Foto
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाने  सीआरपीएफने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्या अहवालानुसार  अर्थात शिघ्र कृती दलातील एका जवानाने पॅलेट गनमधून  आंदोलकांवर सात गोळ्या चालवल्या होत्या ज्यापैकी पाच आंदोलकांना लागल्या अशी माहिती समोर आली आहे. कॉक्रोच जनता पार्टी अर्थात  सीजेपीने २० जुलैला चलो संसद हा मार्च आयोजित केला होता. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शीघ्र कृती दलाच्या जवानाने सात राऊंड फायर केले होते अशी माहिती आता समोर आली आहे. एका वृत्तानुसार पॅलेट गनमधून झाडण्यात आलेल्या सात पैकी पाच गोळ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांना लागल्या.

सीआरपीएफकडून २० जुलैच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत पॅलेट गनचा वापर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. २० जुलैच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनचा वापर आंदोलकांवर करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर  ने या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या अहवालात पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. पॅलेट गनमधून एकूण सात गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी पाच आंदोलकांना लागल्या आणि दोन जमिनीवर पडल्या असं समोर आलं आहे.

पॅलेट गनचे छर्रे लागल्याने तीन आंदोलक जखमी झाले होते. गुडगावमध्ये काम करणारे इरशाद शेख, दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी साहिल लोहचब, आणि आऊटलुकचा पत्रकार अशा तिघांना छर्रे लागले आणि ते जखमी झाले असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात हे देखील नमूद करण्यात आलं आहे की आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला आणि दगडफेक केली. ज्यानंतर पॅलेट गनचा वापर झाला आणि गोळ्या झाडल्या गेल्या. सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेश प्रताप सिंह म्हणाले की आंदोलन आता संपलं आहे आणि आंदोलक माघारी गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आम्ही आणखी सखोल चौकशी आता करणार आहोत. दरम्यान  च्या महानिरीक्षक सीमा धुंधिया यांनी सीआरपीएफच्या प्रवक्त्यांना काही प्रश्न उपस्थित करणारं पत्र पाठवलं होतं मात्र त्याचं काही उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही. या आधी सीमा धुंधिया यांनी इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना हे सांगितलं होतं की आंदोलकांना हटवण्यासाठी जे काही करण्यात आलं जी पद्धत वापरली गेली ती नियमांना अनुसरुन नव्हती.