छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट हायमास्ट दिव्याच्या खांबाला जाऊन धडकला. हा अपघात येथील स्व. गोरख वाघ चौक परिसरात शनिवारी (दि.९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.
एमआयडीसीतील एका कंपनीत माल भरण्यासाठी जाणारा आयशर ट्रक घरापासून काही अंतरावर येताच त्याचे केबिन अचानक उघडले. चालक कृष्णा भालेकर (४०, रा त्रिमूर्ती चौक, तनवाणी शाळेजवळ) हा आयशर ट्रक (क्र. एमएच-२०, सीटी-४३२८) मधून वाळूज एमआयडीसीत एका कारखान्यात मटेरियल भरण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघात घडताच शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यात ट्रकचे केबिन पूर्णपणे उखडून पडले होते. तर चालक कृष्णा भालेकर हा वाहनात अडकला होता. यावेळी खंडागळे यांनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












