सिल्लोड, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एक पेड माँ के नाम या उपक्रमातून अजिंठा येथील पोस्ट कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दुर्मिळ वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या वेळी जिल्हा सहकार्यवाह व अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील, यांनी विकसित केलेल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प -व हरित मानचिन्ह जारुळ तामण, ऑपरेशन सिंदूरला समर्पित वृक्ष सिंदूर, आय युसीएनच्या यादीत संकटग्रस्त म्हणून समावेश असलेल्या रक्तबीजा (बिजा) इ. दुर्मिळ सहा रोपांचे रोपण केले.
यावेळी पोस्ट मास्तर गणेश प्रधान, डॉ. संतोष पाटील, इतिहासकार विजय पगारे, अजिंठा पोलीस स्टेशनचे जमादार जाधव, पो. हे कॉन्स्टेबल पाईकराव व पो. हे. कॉ. राठोड, पो. हे. कॉ. भागवत शेळके, प्रमोद पवार (पोस्ट मास्तर फर्दापुर) पोसीएम बडोदे (कन्नड पोस्ट ऑफिस) अमोल वाघ (डाक सेवक अजिंठा) डाक सेवक, सुभाष जाधव, पवन गवळी, भगवान पद्मवंशी, बबलू भैया, सय्यद अनिस, सय्यद सलमान, बंटी ठाकूर आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले. संगोपनाची जबाबदारी पोस्ट कार्यालयाने स्वीकारली आहे.














