अवैध गौण खनिज वाहतूक अनेकांसाठी ठरली जिवघेणी
फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन करून आपली तुमडी भरणाऱ्या गौण खनिज चोरामुळे परिसरात अनेकांना आपले जिव गमवत आहे. (दि.९) गुरुवार रोजी रात्री एक वाजता महिंद्रा ट्रॅक्टर पलटी होऊन एक सतरा वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वडोद बाजार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
खामगाव गोरक्ष नाथ ता फुलंब्री येथील रोहित कैलास सोनवणे वय १७ वर्षे या अल्पवयीन तरुणाचा ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली दबून ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत सध्या खुलेआम वाळु मुरुम यांची अवैध चोरी व अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गुरुवारी रात्री विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये जेसीबी द्वारे मुरूम भरून देण्याचे काम सुरू होते.
ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने या वाहनाखाली दबून रोहित सोनवणे दबला गेला. त्यास त्वरीत फुलंब्री येथील महात्मा फुले क्रिडा रुग्णवाहिके द्वारे चालक विजय देवमाळी याने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या महसुल प्रशासन या ठिकाणचा पंचनामा करून रात्री आणि दिवसानह शेतकरी चंद्रकलाबाई सुधाकर वाघ यांना कार्यवाही होऊन न्यायाची प्रतिक्षा आहे.
मात्र या तरुणाचा मृत्यु कुठे ? ट्रॅक्टर (वाहन) कोणते? घटना स्थळ या बाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसून वडोद मुरूम चोरी व तरुणाचा मृत्यु यात साम्यता नाही असे कळते याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुस्ताक पटेल हे करत आहे. आठ दिवसा पूर्वी रात्री ट्रॅक्टर रोडखाली जाऊन अपघातात एकाचा जिव गेला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. यामुळे गौण खनिज चोरी जिवघेणी ठरत आहे.
तपासून मृत घोषित केले. सदर घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच रात्री फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार गायरान गट न २८८ येथील गायरान धारक कास्तकरी शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीपी क्र- एम एच २० एफ जी २७ १० द्वारे ट्रॅक्टर च्या सहाय्याने मुरुमाची चोरी सुरू आहे . ट्रक्टर क्र एम एच २० एच बी ९०१४ व इतर नंबर नसलेल्या टक्टरने मुरूम उत्खनन सुरू आहे केला होता.














