सिल्लोड शहरातील बायपासवर घडला अपघात, कुटूंबावर शोककळा
सिल्लोड, (प्रतिनिधी): दुचाकी बंद पडल्यामुळे रस्ता ओलांडत असतांना सिल्लोड येथून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या भरधाव बसने दुचालकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात युवक जागीच ठार झाला. ही घटना दि सोमवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव अजिनाथ धोंडीराम फुले (वय २८ रा पिंपळगाव पेठ, ता, सिल्लोड) असे आहे.
अजिनाथ हा पिंपळगाव पेठ येथून सिल्लोड येथे दवाखान्यात दाखल असलेल्या आपल्या चुलत भावाच्या मुलाला भेटण्यासाठी त्याच्या होंडा शाईन (क्र. एम. एच. २० एफ एम ८३३४) वरून येत होता. शहरातील हॉटेल पूजा समोर त्याची दुचाकी बंद पडली. रस्ता ओलांडत असतांना मलकापूर डेपोची बस सिल्लोडकडून संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जात असताना बसने दुचाकीस जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अजिनाथ यांस बसने सुमारे १०९ फूट फरपटत नेले यातच अजिनाथ चा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्त अजिनाथ यास उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात
चिमुकल्या मुलीचा लाडका बाबा गेला क्षणांतच एका हसऱ्या स्वप्नांनी भरलेल्या तरुणाचा जीवनप्रवास संपला. अजिनाथ हा कष्टाळू शेतकरी होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबून कुटुंबाचा संसार चालवणारा हा तरुण आज कायमचा निघून गेला. आई वडिलांचा आधार, भावाचा खंबीर हात, पत्नीचा संसाराचा जोडीदार आणि एका चिमुकल्या मुलीचा लाडका बाबा एका क्षणात सर्व काही हिरावून गेला.
-- नियतीचा असाही घात --
या घटनेत सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, अजिनाथ हा सिल्लोड येथील दवाखान्यात दाखल असलेल्या आपल्या चुलत भावाच्या मुलाला भेटण्यासाठी निघाला होता. त्या लेकराला धीर द्यायला जाणारा हातच काळाने अर्ध्या वाटेत थांबवला. ज्याला पाहण्यासाठी तो धावत होता, त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच नियतीने त्यांना कवटाळले आहे.
-- पिंपळगाव पेठ गावात शोककळा --
घरी अजूनही आजीनाथच्या येण्याची वाट पाहणारे डोळे थिजले आहेत. पत्नीच्या कुंकवाचा रंग फिका झाला आहे. चिमुकली मुलगी बाबा कधी येणार? असा निरागस प्रश्न विचारत आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याचा बाबा आता कधीच येणार नाहीत. पिंपळगावपेठ गावात शोककळा पसरली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. एका कष्टाळू शेतकऱ्याचा, एका प्रेमळ पतीचा आणि एका लेकराच्या आधारस्तंभाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मात्र डॉक्टरांनी अजिनाथ यास तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालय येथे आजीनाथ चे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पिंपळगाव पेठ येथे आजीनाथवर शोकाकुल वातावरणात सोमवारी संध्याकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात घेतली. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.













