एमआयएम नगरसेवक मतीन पटेल अडचणीत निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नाशिकमधील कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला संभाजीनगरातील नारेगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन मजीद पटेल यांचे नाव चर्चे त आले असून, निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान निदा खान गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासात मतीन पटेल यांनी
वातावरण तापले
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. तर जलील यांनी हे आरोप राजकीय हेतूने केले जात असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. फरार काळातील हालचाली आणि आर्थिक मदतीबाबत चौकशी आवश्यक असल्याचे सांगत सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नारेगाव परिसरात राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिल्याचे समोर आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यानंतर नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी रात्री निदा खानला
ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी दुपारपासूनच मतीन पटेल यांची चौकशी सुरू केली होती. अनेक तासांच्या चौकशीनंतर निदा खानचा ठावठिकाणा समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाइल जप्त करत नोटीसही बजावली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions