एटीएममध्ये ठणठणाट; नागरिक झाले त्रस्त दोन हजारांच्या नोटाही गायब

Foto


औरंगाबाद:  शहराबरोबर ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटाही गायब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.एक तर निवडणुका त्यात सलग सुट्या आल्याने नागरिकांचे पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बर्‍याचशा एटीएममध्ये ठणठणाट झाल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.  यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून अनेक एटीएम बंद आहेत. तर काही एटीएम नावालाच असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. याशिवाय वरिष्ठ स्तरावरुनच दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत येणे कमी झाले आहे. त्यामुळे एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. नागरिकांना 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा काढाव्या लागत आहेत. त्याही आता नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्‍त केली जात आहे.
पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
सलग सुट्या त्यात नागरिकांचे पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. एटीएममध्ये पैसे टाकताच नागरिक पैसे काढून घेतात. त्यामुळे लवकर पैसे संपत आहेत. तसेच वरिष्ठ स्तरावरुनच दोन हजार रुपयांच्या नोटा येणे कमी झाले आहे.