गेल्या 20 वर्षांपासून नगरपरिषदेवर आ.अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे.यावेळेस भाजपने मोठे आव्हान दिले असल्याने आ.अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे यावेळेस नगरपरिषद कोणाच्या ताब्यात येते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड नगरपरिषदेच्या 26 नगरसवेक आणि 1 नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज दि.27 रोजी सकाळपासून मतदानास सुरूवात झाली.आ.अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व असणार्या नगरपरिषदेच्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील नगराध्यक्षपद आ.सत्तार यांचे पूत्र अब्दुल समीर यांच्याकडे होते.यावर्षी नगराध्यक्षपद अनूसूचित जातीसाठी राखीव असल्याने आ.सत्तार यांनी आपल्या उमदेवाराच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पदयात्रा,कॉर्नर सभा घेवून प्रचार केला.त्यात भाजपने नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी मोठे आव्हान दिल्याने उद्या होणार्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.