मुंबई -
राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची मंगळवारी बदली करण्यात आली. रात्री उशिरा या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
निघाले. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची नागपूर महापालिका आयुक्त पदी
नियुक्ती करण्यात आली आहे. यासर्व बदल्या
प्रामुख्याने विदर्भातील आहेत.
कोणते अधिकारी
कुठे जाणार बदलून
जिल्हाधिकारी
अभिजीत बांगर हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेेत. पालघर जिल्हाधिकारी पदी असताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला होता. एप्रिल २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांची बदली आता नागपूर महापालिका आयुक्त पदी करण्यात आली
आहे.
एमएस सीड्स कॉर्पोरेशन अकोलाचे ओमप्रकाश देशमुख यांची नियुक्ती अमरावती जिल्हाधिकारीपदी झाली आहे. देशमुख हे २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. २००६ बॅचचे अधिकारी नागपूर मनपा आयुक्त विरेंद्र सिंह यांची बदली कौशल्य विकास आयुक्त पदी नवी मुंबई येथे झाली आहे. अपंग कल्याण विभागाचे आयुक्त २००९ च्या बॅचचे आयएएस रुचेश जैवंशी यांची नियुक्ती हिंगोली जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. २०१० च्या बॅचचे अधिकारी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी अकोला सीड कॉर्पोरेशन आयुक्त पदी बदली झाली आहे. या पाच बदल्यापैकी चार या विदर्भातील आहेत.
















