अभिजित दीपकेंचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके दिल्लीतील आंदोलनानंतर प्रथमच बुधवारी सिडको वाळूज महानगरातील घरी परतले. यावेळी त्यांच्या ५० मातोश्री अनिता, वडील भगवान व कुटुंबीय, समर्थकांनी औक्षण करून स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. ४० दिवसांनंतर आज आईच्या हातचे जेवण मिळणार असून निवांत झोप लागेल, अशी भावना व्यक्त यावेळी अभिजित यांनी व्यक्त केली.
ची या टी, टर हत. तिने स, व्य, टक कय
विमानतळावर त्यांनी ता माध्यमांशी संवाद साधला. या सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचे रक्त वाहिले. आता
त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांना धमक्या देत त्रास दिला जात आहेत. सरकारने सुधारावे. विद्यार्थ्यांनी फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. हे सरकार ताळ्यावर आले नाही तर, विद्यार्थी उद्या सरकारही बदलतील, असा इशारा दीपके यांनी दिला.
अभिजीत दीपके घरी येणार असल्याचे समजताच त्यांच्या आई अनिता दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आज गुरुपौर्णिमा असून, याच दिवशी अभिजीत घरी येत आहे. हा योगायोग कसा जुळून आला, हे आम्हालाही माहीत नाही; मात्र तो
अतिशय सुंदर आहे. आधी आम्ही त्याचे आई-वडील होतो; पण आता तो आमच्यासाठी गुरुसमान झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याने केलेला संघर्ष आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले काम आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
शिवाजी महाराज, बाबासाहेबांना अभिवादन
संभाजीनगर विमानतळावर आगमनानंतर दीपके यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बजाजनगर येथील निवासस्थानी प्रस्थान केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions