छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा असून नियमित पुरवठाही होत आहे. कोणत्याही प्रकारची टंचाईची परिस्थिती नाही. खबरदारी म्हणून केवळ व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
इराण-इस्राईल, अमेरिका युद्धाचा परिमाण भारतात जाणवू लागला आहे. घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचे भाव काही दिवसांपूर्वीच वाढविले होते. आता त्यात आणखीनच भर पडली आहे. दोन दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी गॅस एजन्सीवर रांगा लावल्या आहेत. तर व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल, खानावळी, कारखाने यांच्यावरही परिमाण जाणवू लागला आहे.















