औरंगाबाद- डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणात मंगळवारी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकांक्षाचा खून झाल्यानंतर पोलिसांना न कळवता मृतदेह जागेवरुन हलवणाऱ्या वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे एमजीएम परिसरात मुकआंदोलन करण्यात आले. शिवाय एमजीएम संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना महाविद्यालयामध्ये पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा अभाविपने दिला आहे.
एमजीएममध्ये
फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख हीचा दि.११ हॉस्टेलच्या रुममध्ये
घूसून गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यामुळे अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा
घेत एमजीएमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अखिल भारतीय
विद्यार्थी परिषदेतर्फे आकांक्षाचा खून झाल्यानंतर तिच्या मृतदेह पोलिसांना घटनेची माहिती न देता हलवणाऱ्या हॉस्टेलच्या
रेक्टर, वार्डन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी अभाविपने केली आहे.
अभाविपने काल
घेतली होती अंकुशराव कदम यांची भेट
डॉ.आकांक्षा
देशमुख हीच्या हत्येला सहा दिवस उलटूनही आरोपींचा शोध पोलिसांना का लागलेला नाही. आणि हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांवर
कारवाई का झाली नाही. हा जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता.१८) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एमजीएमचे
सचिव अंकुशराव कदम यांची भेट घेतली होती. मात्र ‘असे अनेक गुन्हे
होत असतात,
ज्यात आरोपी मोकाट फिरतात’ असे कदम यांनी वक्तव्य केल्याने पदाधिकाऱ्यांचा
संताप वरचढ झाला होता.
आणि निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती.
एमजीएम प्रशासनाकडून हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न
आकांक्षाचा खून झाल्यानंतर मृतदेह हलविण्याआधी प्रथमदर्शी हॉस्टेलच्या वार्डन, रेक्टर यांनी घटनेची माहिती पोलिसांना देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे न करता, उलट हे प्रकरण आत्महत्या म्हणून दर्शविण्याचा प्रयत्न केला. यानंतरही त्यांना निलंबित न करता एमजीएम प्रशासन त्यांना पाठिशी घालत आहे. असा आरोप अभाविपने केला आहे.
अंकुशराव कदम यांच्याकडून राजकीय बळाचा वापर
आकांक्षाला न्याय
मिळावा यामागणीसाठी लोकशाही पध्दतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी
कदम हे त्यांच्या राजकीय शक्तीचा वापर करत आहेत. पोलिस, खासगी बाउंसर्स यांचा वापर
करुन ते आंदोलकांवर दबाव टाकत आहेत. असा गंभीर आरोप अभाविपने केला आहे.
यावेळी अभाविपचे
पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस,
दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.












