महिनाभरात 'नो नेटवर्क'" भागालाही मिळणार पाणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न असलेल्या 'नो नेटवर्क' भागाला दिलासा देण्यासाठी महापालिकेचे नियोजन सुरू आहे. परिसरासाठी अंतर्गत जलवाहिन्या जोडण्याचे काम आणि जलकुंभांची स्वच्छता वेगात सुरू करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात म्हणजेच आगामी दिवाळी सणादरम्यान 'नो नेटवर्क' भागात प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने कंत्राटदार कंपनीला तातडीने मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, १५०० च्या जलवाहिनीमधून सिडको हडको भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच २००० च्या जलवाहिनीमधून अनेक भागाला पाणी दिले जात आहे. शहरातील 'नो-नेटवर्क' भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. सातारा-देवळाई, मिसारवाडी, पिसादेवी रोड, मिटमिटा, सुंदरवाडी यासह इतर भागालाही पाणी दिले जाणार आहे.
https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions












