रायगडावरून परतत असताना ट्रक-कारचा भीषण अपघात ; ९ बालमित्रांचा करूण अंत

Foto
पुणे: पुणे सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा कार आणि ट्रकमध्ये रात्री १२:५० मि. झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. ह्यातील सर्व जण महाविद्यालयाीण विद्यार्थी आहेत. या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी  सर्व मृतांची नावे आहेत. 

एकाही घरात  पेटली नाही चुल...  
सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत.  या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. सर्व तरुण एकाच गावातील असून बालपणाचे मित्र आहेत. या सर्वांच्या अपघाती मृत्यूमुळे यवत गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळपासूनच गावामध्ये भयान शांतता पसरली होती. तसेच गावातील एकाही घरात चुलही पेटली नाही. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker