नाशिक- येवला - मनमाड मार्गावर एर्टिगा आणि आयशर या दोन चारचाकींची
समोरासमोर धडक झाली. यात ६ जण ठार झाले असून यात २ पुरुष, ३ महिलांचा आणि १
लहान मुलाचा समावेश आहे. अंकाई बारीजवळ हा अपघात
झाला. बुधवारी (ता.२१) पहाटे ५ वाजता हा अपघात झाल्याचे समजते.
मृत झालेले कुटुंब
हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव गावातील रहिवासी आहे. कोपरंगाव येथील शारदा नगर
भागात राहणारे आनाड कुटुंब आपल्या बहिणीला आणण्यासाठी इंदोरहून परतत असाताना ही
घटना घडली. पहाटे पाच वाजता मनमाड-येवला रस्त्यावर त्यांच्या एर्टिगा गाडी (क्र.एम
एच.१७ डीएल १८८१) ला येवल्या कडून मनमाड च्या दिशेने जाणाऱ्या आयशरने( क्र.एच आर
४५ ए ७०७०) समोरून जोरदार धडक दिली. यात चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला.
अपघातातील मृतांची नावे
बाळासाहेब मुरलीधर
आनाड(वय ६०), इंदुबाई
बाळासाहेब आनाड(वय ५५ ), श्रीनाथ बाळासाहेब आनाड(वय २५),
मोहिनी गणेश खांदवे, हरी गणेश खांदवे(वय ५),
आणि भिमाबाई बापू गोखले(वय ७०)
अपघातानंतर आयशरचा
चालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
















