सातारा : साताऱ्यातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे . अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्याबाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत . फलटण येथील डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला व प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती .या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला . पण आता या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही .या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .
मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ
गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत असला तरी त्याचा मोबाईल फोन कुठे आहे याबाबत तो माहिती लपवत आहे . त्याने मोबाईल लपवलं असल्याची कबुली पोलिसांना मिळाली असून तो नेमका कुठे लपवला आहे हे तो सांगत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं .पोलिसांना या मोबाईल मध्ये असलेले मेसेज, कॉल डिटेल्स आणि महत्त्वाचे पुरावे मिळाल्यास या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात .
महिला डॉक्टरशी दोन्ही आरोपींचा संपर्क
या आत्महत्या प्रकरणात केवळ गोपाल बदनेच नव्हे तर आरोपी प्रशांत बनकर हाही महिला डॉक्टरच्या संपर्कात होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे .आत्महत्येच्या अगोदरपर्यंत बनकर डॉक्टरशी संवाद साधत होता हे डिजिटल पुराव्यांद्वारे पोलिसांनी स्पष्ट केला आहे .या दोन्ही आरोपींनी महिला डॉक्टरची नियमित संपर्कात असल्याची कबुलीही दिली आहे . आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात डॉक्टर महिला हे दोन्ही संशयित आरोपींच्या संपर्कात होती .संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत डॉक्टर महिलेचे बोलणे आणि चॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली होती . आरोपी प्रशांत बदने याने शरण येण्यापूर्वी आपलं मोबाईल लपवलाय. त्यामुळे आरोपी पुरावे लपवत असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान गोपाल बदने सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे .गोपाळ बदनेचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याचं समोर आला आहे .ज्यामध्ये वर्दीवर नसलेला हा पीएसआय गोपाळ बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे .