घराच्या पत्र्यावर एमडी ड्रग्ज लपविणार्‍या आरोपीस अटक

Foto

 छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घराच्या पत्र्यावर ड्रग्ज लवपणार्‍या शेख कलीम शेख सरदार याला गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात सव्वा लाखाच्या एमडी ड्रग्जसह एक तलवारही जप्त केली. या गुन्ह्यात एका फरार आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहाबाजार परिसरातील एका घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि सिरपचा साठा जप्त केला होता. या तपासादरम्यान अटकेतील आरोपी शेख कलीमने चक्क घराच्या पत्र्यावर एमडी ड्रग्ज लपवल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख २४ हजारांचे हे २०.६९ ग्रॅम ड्रग्ज ताब्यात घेतले. एक तलवारदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली. याबाबत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, शेख नवाब, अशरफ सय्यद यांनी केली. गुन्हे शाखेने या गुन्ह्यात पसार असलेल्या शेख सोहेल ऊर्फ चाऊ शेख सत्तार (वय २३, रा. बायजीपुरा) यालाही अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सोहेल हा अश्पाकचा मित्र असून, एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातही तो सहआरोपी असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.