साजवार्ता
Page No.: 8 Date: 23/11/2026
एटीएसकडून समांतर होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): लग्नाचे आमिष दाखवून १४ तरुणींचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद (३२, रा. काजीवाडा, भडकल गेट) याच्या पोलिस कोठडीतील चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी एकाच वेळी चार तरुणींना एकमेकींचा सुगावा लागू न देता फिरवत असून, त्यासाठी त्याने औरंगपुरा परिसरातील दोन हॉटेल्समध्ये 'उधारीचे खाते' सुरू केल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे दुबईतील वास्तव्यादरम्यान त्याची एका पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) या तपासात एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिममध्ये पिळदार शरीरयष्टी कमावलेला माझीन विविध खासगी कंपन्यांत नोकरी करत महिला सहकाऱ्यांशी जवळीक साधायचा. कौटुंबिक संवाद साधून भावनिक जाळ्यात ओढण्यासाठी तो सुरुवातीला
प्रकरणाला वेगळे वळण : शहरातील दोन हॉटेल्सही पोलिसांच्या रडारवर
डाटा रिकव्हरी करण्याचा प्रयत्न
मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला असून मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याने तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दुबई व अन्य कोणत्या देशात प्रवास केला याचाही तपास करण्यात येणार आहे.
तरुणींना उसनवारीने पैसे देऊन विश्वास जिंकायचा आणि नंतर त्यांच्याकडूनच पैसे उकळायचा. 'कॅफेमध्ये भेटू' असे सांगून तो त्यांना औरंगपुऱ्यातील ठरलेल्या दोन हॉटेल्सवर न्यायचा. या हॉटेल्समध्ये त्याचे नियमित येणे-जाणे असल्याने कोणतेही ओळखपत्र न तपासताच त्याला रूम दिली जात होती. आता ही दोन्ही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत. भांडाफोड होण्याच्या भीतीने दुबईला पसार झालेल्या माझीनची तेथे एका पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाली. मात्र, त्यानेच गुंतवणुकीच्या बहाण्याने माझीनला गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याचे परदेशी कनेक्शन, आर्थिक व्यवहार आणि शोषणाची व्याप्ती पाहता एटीएसकडूनही समांतर तपास होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













