मुंबई : शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, अनिल कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना अभिनयाचे धडे देणारे अॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मिथिका, मुलगा रोहित आणि राहुल असा परिवार आहे. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती रोशन तनेजा यांनी दिली. रोशन तनेजा यांनी मुंबईत अॅक्टिंग स्कूलची स्थापना केली होती.