६० लाखांचा मुद्देमाल जप्त, वाघाडी परिसरात गोदावरी
नदीच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरुच
नदीच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरुच
पैठण, (प्रतिनिधी) पैठण तालुक्यात कुठेही बाळूपट्ट्याया लिलाव झालेले नसतानाही अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात म्हटले असल्याचे लक्षात येताच वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू चोरीचा सपाटा लावला आहे. पोलीस स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघाडी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू माफियांनी भर दिवसा मोठ्या प्रमाणात केनीच्या सहाय्याने वाळूचा उपसाकरून ते वाहनात भरत असताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला असता त्यांना या ठिकाणी चार हायवा मध्ये लोडर ट्रॅक्टरच्या सहाव्याने बाळू भरताना आढळून आले.
पोलित्तांनी सदरील वाहने पोलीस ठाण्यात आणून लावल्या असून या प्रकरणी शाहरुख चांद शेख ३० राहणार नवीन कावसान पैठण, अदनान इस्माईल शेख २० राहणार साळीवाडा पैठण, अविष्कार
संजय जाधव२६ राहणार मुधलवाडी, स्वप्निल गणेश चव्हाण २८ राहणार नवीन कावसन, अक्षय गोलटे राहणार पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा भारतीय न्याय संहिता सह कलम गौण खनिज कायदा अंतर्गत पोलीस आमदार अंकुश शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी ९०९ टिप्पर क्र. एम. एच. १२ यू. एम. १९५३ ज्याची किंमत अंदाजे १५ लाख रुपये, टिप्पर क्रमांक एम. एच. २० इजी १४१५) ज्याची किंमत पंधरा लाख रुपये, टिप्पर (क्रमांक १०९ एम एच २० जी झेड़ १८५५) ९०९ टिप्पर (क्र.एम एच २१ बी. डोड ४४७१) ९०९ टिप्पर (क्रमांक एम. एच. १२ यू. एम. १९५३) असा एकूण साठ लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस आल्याची माहिती मिळतात ट्रॅक्टर चालक केनी सह फनार झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक तळेकर हे करीत आहे.














