१ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पैठण, (प्रतिनिधी) : गोवंश क्रूरतेने व निर्दयीपणे वाहनात भरून कत्तलीसाठी महिंद्रागाडीत कोंबून घेऊन जात असताना आढळून आले असल्याने पैठण पोलिसात चार जनाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम प्रमाणे उपनिरीक्षक संभाजी महादेव खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राम रमेश पाटेकर रा. क-हेटाकळी (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर).समीर सलाम कुरेशी (रा.कुरेशी मोहला, पैठण ता. पैठण,) , एक अनोळखी इसम (फरार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कडून 10 हजार रुपये किमतीचा एक काळ्या पांढर्या रंगाचा चट्टेपट्टे हाब्रेट गो-हा, 10 हजार रुपये किमतीची एक काळी हाब्रेट कालवड,
20 हजार रुपये किमतीची एक पांढ-या शुभ्र रंगाची खिल्लारी गाय, 20 हजार-रुपये किमतीची एक पांढ-या शुभ्र रंगाची खिल्लारी गाय, 20 हजार रुपये किमतीची एक काळ्या पांढर्या रंगाची गाय, 5 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची लहान कालवड,70 हजार रूपये किमतीची जितो महिन्द्रा गाडी (क्र. एम. एब. ४५ ए.ई.०३०१) जु वा कि अं एकुण - 1 लाख 55 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों गायकवाड हे करीत आहेत. यातील आरोपी समीर सलाम कुरेशी याच्याविरुद्ध पैठण पोलिसात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.