फुलंब्री, (प्रतिनिधी) शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत कत्तलीसाठी बांधलेली ८ गोवंशीय जनावरे जिवंत अवस्थेत ताब्यात घेण्यात आली आहे.
८ संशयितांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कुरेशी मोहल्ला परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पाल येथील गोशाळेत हलवण्यात आले आहे. छाप्यात जनावरांसह कत्तलीचे साहित्य आणि गोमांसही जप्त करण्यात आले.
जप्त केलेले मांस नाशवंत असल्याने या गुन्ह्यात रेशा ऊर्फ हजेव कुरेशी, इरफान कुरेशी, फराज ऊर्फ बिट्टचा, फारूक कुरेशी, मुस्तफा कुरेशी, जावेद भाई, इद्रीस कुरेशी आणि हमीद कुरेशी यांचा समावेश आहे. जप्त केलेली जनावरे आणि साहित्याची एकूण किंमत १० लाख ४६ हजार रुपयांहून अधिक आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
नगरपालिकेच्या कचरा डेपोत जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून ते नष्ट करण्यात आले. या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्यासह धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरातील सर्व भागांत तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.













