गंगापूर तालुक्यात मंडळ अधिकाऱ्यांची कारवाई; २ जेसीबी, २ डंपर जप्त

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील मोजे पिंपळवाडी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाने सोमवारी (दि.११ मे २०२६) मोठी कारवाई केली.

तहसीलदार तथा नवनाथ प्रशिक्षणार्थी दगवाड तहसीलदार सागर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत दोन जेसीबी आणि दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. पिंपळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर महसूल पथकाने नदीपात्रात छापा टाकला. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईमध्ये यांचा सहभाग कारवाईत सहभागी महसूल पथक या कारवाईमध्ये मंडळ  अधिकारी मनिषा कोतकर, ग्राम महसूल अधिकारी राजेश खराडकर, गीता सरक, ब्रजेश पारवे, मनोज घोडके, जमादार नारायण शिंदे तसेच स्थानिक पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान दोन डंपर आणि दोन जेसीबी ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोन डंपर व एक जेसीबी यशस्वीरित्या गंगापूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. गौण खनीज माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

-- दुसरा जेसीबी तांत्रिक बिघाडामुळे नदीपात्रातच कारवाई -- 
दरम्यान दुसरा जेसीबी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तो नदीपात्रातच उभा आहे. संबंधित जेसीबी स्थानिक पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला असून, तो हलवण्याची व अधिकृत जप्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

-- गंगापूर महसूल विभागाच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत -- 
या धडक कारवाईमुळे गंगापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल विभागाने दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून मंडळ अधिकारी मनिषा कोतकर, ग्राम महसूल अधिकारी राजेश खराडकर, गीता सरक, ब्रजेश पारवे आदींचे कौतुक होत आहे.

-- अवैध उत्खननाविरोधातील मोहीम अधिक तीव्र होणार -- 
तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या माफियांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, 
नवनाथ वगवाड, तहसीलदार,