शुभम लूटे
वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरासह तालुक्यामध्ये सध्या हजार नव्हे लाख नव्हे तर कोट्यावधी रुपयांच्या कामाची घोषणा होत आहे. कधी नव्हे तो शहरासह तालुक्याला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय. अभियंता असणाऱ्याला काम देण्याऐवजी कार्यकर्तेतें हेच अभियंते बनत आहेत. तर मग त्या कामात गुणवत्ता कोठून येईल असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात रस्ते सामाजिक सभागृह संरक्षण भिंती इत्यादी कामांसाठी
आहेत. या रस्त्यावर वरील सिमेंट तर कधीच उडून गेले आहेत. आज वैजापूर शहरातील कुठलाही रस्ता घेतला तर त्या रस्त्यावरील सिमेंट निघून जाऊन मोठ मोठे खड्डे पडलेले बघायला मिळत आहेत. राजकीय कार्यकर्ते च ठेकेदार असल्यामुळे नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे दोषी अधीकारी व ठेकेदार दोघांचे फावत आहे.
गुणवत्ता विभाग करते तरी काय :
शासनाचे कुठलेही काम झाले की त्याची तपासणी करण्याची जबाबदारी गुणवत्ता विभागाची असते. परंतु टक्केवारी मिळत असल्याने कॉलिटी कंट्रोल विभाग कोणाचीही बिल न अडवता बिल पास करत आहेत. कार्यकर्ते बनले अभियंता अशी अवस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे कामाला कुठून येणार गुणवत्ता असा सवाल देखील उपस्थित होत आहे. रस्त्याचे बांधकाम करताना काही प्रमाणात सिमेंट ऐवजी सिमेंट सारखा दिसणारा डस्टचा वापरला जातो. ही डस्ट खडी फोडताना तयार केला जातो. पाण्याचा संपर्क येताच काही दिवसातच काँक्रीट सोडून देते. त्यामुळे रस्त्याला तडे जाणे, मोठ्या भेगा पडणे, खडी उघडी पडणे असे प्रकार घडताना दिसत आहेत.
वैजापूरच्या इतिहास कधी नव्हे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला, त्याचा योग्य उपयोग व्हावा अशी अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होत आहे.
कोट्यावधींचा निधी दिला जात आहे. परंतु हा निधी देताना ज्यांना कधी वाळूमध्ये सिमेंट किती टाकायचे हे माहित नाही, अशा कार्यकर्त्यांना कोट्यावधीचे कामे दिली जात आहेत. मग हे कार्यकर्ते आपला हिस्सा काढून इतर शासकीय गुत्तेदारांकडून कामे करून घेत आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा अतिशय खालच्या दर्जाचा ठरत आहे.
टक्केवारीमुळे कोट्यावधीचा निधी वाया जात आहे. लोकप्रतिनिधींना कार्यकर्ते सांभाळावे लागतात. परंतु गुणवत्तेकडे लक्ष देणे, ही लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. वैजापूर शहरासह ग्रामीण भागात तयार झालेले रस्ते वर्ष सहा महिन्यात उखडले