आर्य चाणक्य विद्या मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्त उपक्रम

Foto
पैठण  (प्रतिनिधी): प्रसारक संचलित प्राथमिक भारतीय शिक्षण संस्था, अंबाजोगाई आर्य चाणक्य विद्यामंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय सरकारी हुद्यावर बसली असती काय या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद काकडे, तर
प्रमुख अतिथी म्हणुन उज्वला कुटे, वर्षा पाडळकर यांची उपस्थिती लाभली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. मनस्वी लोहारे हीने वैयक्तिक पद्य सादर केले.  

तसेच आदिती जैवळ, श्रुतिका रंधे यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई यांच्या मार्गदर्शन जीवनकार्याविषयी केले. त्यानंतर प्रांजल साळवेने नृत्य सादर केले. प्रमोद काकडे यांनी अध्यक्षीय समारोपात सावित्रीबाई यांच्या जयंतीच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातवीच्या मुली तसेच सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन. साक्षी बडे व श्रुतिका रंधे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजश्री खेडकर हिने केले.