आदित्य ठाकरेंनी विठ्ठलाची महापूजा सोडली अर्धवट

Foto
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी आले असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ही पूजा अर्धवट सोडावी लागली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य यांना पूजा सुरू असताना बाहेर पडावे लागले. काही वेळाने बरे वाटल्यावर पुन्हा ते पूजेच्या ठिकाणी आले होते.

आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभ्यात महापूजेसाठी बसले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना गुदमरल्यासारखे झाले आणि अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पूजा अर्धवट सोडली आणि मंदिराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले. आदित्य ठाकरे अचानक पूजा सोडून बाहेर आल्याने त्यांचे सुरक्षा रक्षकही चक्रावून गेले. त्यांच्या भोवती एकच गराडा पडला. पण त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं कळताच त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धातास गाडीत बसल्यावर त्यांना थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर आदित्य पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन घेऊन मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. या कार्यक्रमात त्यांनी भागही घेतला. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker