यंग ग्‍लोबल लिडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव

Foto


मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक, असे दोन गट निर्माण झाले. यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या पारड्यात टाकले. या संपूर्ण घटनेमुळे ठाकरे कुटुंबावर मोठ्या राजकीय संघर्षाची वेळ आली आहे. यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२३च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) या वर्षासाठी जगातील ४० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांच्या यादीची घोषणा केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, हे लोक संवादात सक्षम आर्टिफिशल इंटेलिजन्स ते आर्थिक समावेशापर्यंत विविध कामांमध्ये सामील आहेत. आणि अशा गटात येतात, ज्याचे सदस्य पुढे चालून नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्राचे प्रमुख, फॉर्च्युन ५०० कंपन्यांचे सीईओ आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते होऊ शकतात.


या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ १०० तरुणांची निवड करण्यात आली आहे. यात राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, मोठ्या परिवर्तनात्मक संशोधनाशी संबंधित, भविष्याचा विचार करणारे कार्यकर्ते आणि आपला समुदाय, देश आणि जगात सकारात्मक तथा दीर्घकालीन बदलांना गती देत आहेत, अशा तरुणांचा समावेश आहे. तरुण जागतीक नेत्यांची यादी २००४ पासून तयार केली जाते. यात १२०देशांतील १,४०० सदस्यांचा समावेश आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker