माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांचा "तुम्हारे खत में हमारा सलाम"

Foto

औरंगाबाद- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा हस्ते आज महानगपालिकेच्या शहर बस सेवा आणि एस टी पी प्लांट चे उदघाटन आज करण्यात येत आहे. या निमित्ताने ते सकाळी दाखल होताच माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यात नसलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करून म्हाडा कॉलनी जवळील वाहन बाजार परिसरात मोतोश्री लॉन्सच्या उदघाटनाचा घाट घातला आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा महानारपालिकेच्या कार्यक्रमासाठी आहे आणि माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांनी या दौऱ्यात अगोदरच भूमिपूजन आणि उदघाटन झालेल्या मातोश्री लॉन्सच्या उदघाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हावे म्हणून तसेच शिवसेनेत आपले वजन असल्याची जाणीव करण्यासाठी दिखावेगिरी केली आहे. त्यामुळे वाघ यांचा "तुम्हारे खत मे हमारा सलाम" अशी चर्चा सध्या शिवसनिकांमध्ये सुरु झाली आहे. 

 

म्हाडा कॉलनी वॉर्डातून माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांचा दारुण पराभव झाला होता. तेव्हापासून वाघ हे शिवसेनेतून अलिप्त होते. सेनेच्या ना कोणत्या कार्यक्रमाला ना कोणत्या आंदोलनाला वाघ यांचा सहभाग नव्हता अशी माहिती काही शिवसैनिकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. भाऊसाहेब वाघ यांनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अचानक शिवसेनेत आपला सक्रिय सहभाग आज आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्ताने दाखविला हे विशेष. विमानतळ ते क्रांतिचौक दरम्यान जालना रोडवर म्हाडा कॉलनी जवळ वाहन बाजार लागत मोतोश्री लॉन्स उभारण्यात आले आहे. वाघ यांनी खासदार चंद्रकांत खैरे तसेच महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी जवळिक साधून आदित्य ठाकरे याना उदघाटनासाठी आणण्याचा हट्ट धरल्याचे काल महापौर बंगल्यावर दिसून आले. यावेळी सर्व शिवसैनिकांमध्ये चांगलेच खलबत्ते सुरु होते. विमानतळापासून काही अंतरावरच भाऊसाहेब वाघ यांचे मातोश्री लॉन्स असल्याने या लॉन्सचे पुन्हा एकदा उदघाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हावे यासाठी वाघ यांनी सेना नेत्यांकडे चांगलीच फिल्डिंग लावली आहे. ठाकरे यांचा दौरा महानगर पालिकेचा आणि सर्वात पहिले कार्यक्रम भाऊसाहेब वाघ यांचा यामुळे वाघ यांचा तुम्हारे "खत में हमारा सलाम " असा तोरा असल्याने त्यांच्या या कार्यक्रमाने अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.