: वैजापूर, (प्रतिनिधी) वैजापूर येथील जिल्हा न्यायालय वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. मजहर बेग, उपाध्यक्षपदी अॅड. ऐश्वर्या कोठारी, सचिवपदी अॅड. तुषार थोट यांची तर कोषाध्यक्षपदी अॅड. सुरज राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
वकील संघाच्या नुतन कार्यकारीनीची बुधवारी निवड करण्यात आली. यात कार्यकारिणी सदस्यपदी बंदना शिंदे, अशोक सोनवणे, मीरा कोठारी, बोराडे, श्रेणिक दानिश खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणीचा वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. एस. एस. ठोळे, अॅड. एम. आर. शेख, अॅड. डी. एन. जाधव यांनी काम पाहिले. ऍड राजेंद्र सिरसाट ऍड संदीप गायकवाड ऍड महेश कदम ऍड नवनाथ गायकवाड ऍड दीपक कुंदे ऍड नितीन बोराडे इत्यादी उपस्थित होते.












