१८ वर्षांनंतर 'एडीसीए'च्या मैदानावर निवडणुकीची सहसचिव-सदस्यपदांसाठी चुरशीची लढत रंगत;

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या (एडीसीए) निवडणुकीत तब्बल १८ वर्षांनंतर कमालीची चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांसारखी सर्वो च्च पदे बिनविरोध झाली असली, तरी सहसचिव आणि कार्यकारिणी सदस्यांच्या जागांसाठी मात्र जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. प्रमुख पदे बिनविरोध करण्यात यश आल्यानंतर आता उर्वरित जागांसाठी पॅनेलमध्ये आणि अपक्षांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याने, जिल्ह्यातील संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष आगामी २३ जूनला होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे.
औरंगाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, उपाध्यक्षपदी
सचिन मुळे आणि उमेश डबरी, सचिवपदी शिरीष बोराळकर आणि कोषाध्यक्षपदी अनिल इरावणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे संघटनेच्या प्रमुख पदांवरील चित्र स्पष्ट झाले असले तरी उर्वरित सहा जागांसाठीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. सहसचिव पदाच्या एका जागेसाठी अतुल कराड आणि करणसिंग डोग्रा यांच्यात थेट सामना होणार आहे. तर, कार्यकारिणी सदस्यांच्या पाच जागांसाठी मोहन बोरा, सुधीर भालेराव, पवन डोंगरे, महिंदरसिंग कान्सा, सुयोग माछर, निखिल मिटकर, हेमंत मुळे, गौतम नंदावत, इक्बाल सिद्दीकी आणि सुशील वकील हे दहा उमेदवार रिंगणात आहेत. सिडको येथील एडीसीए स्टेडियमवर मतदान होईल. त्यानंतर काही वेळात मतमोजणी होईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions