मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे किशोर तांगडे यांच्या प्रयत्नांना यश
पैठण, (प्रतिनिधी) : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दावरवाडी ग्रामस्थांसाठी आनंदाची व ऐतिहासिक अशी बातमी समोर आली असून, तब्बल ५० वर्षांनंतर दावरवाडी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे प्रत्येक एकादशीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस सेवा सुरू राहणार.या निर्णयामुळे दावरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची दीर्घकालीन प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.
या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचे औचित्य साधत मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर (भाऊ) अशोकराव तांगडे यांच्या वतीने दाववाडी ते श्रीक्षेत्र पैठण या मार्गावर दिवसभरासाठी एस.टी. महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सकाळी ठीक ८.३० झाली. यावेळी गावातील नागरिकांनी वाजता दावरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून पहिली बस श्रीक्षेत्र पैठणसाठी रवाना फटाके वाजवत, आनंद व्यक्त करत या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले. विशेष बाब म्हणजे पहिल्याच बसमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.
या वेळी गावकऱ्यांच्या वतीने एस.टी. महामंडळाच्या चालक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दावरवाडी ग्रामस्थांच्या सोयीसाठी दुसरी बस सकाळी ११.३० वाजता सुटणार असल्याची सूचना देखील महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. यापूर्वी एस टी महामंडळाच्या बसेस गावाबाहेर हायस्कूल जवळ थांबत असत किंवा दावरवाडी फाटा येथे थांबत असत यामुळे वयोवृद्धांना महिला व विद्यार्थ्यांना पायी पायपीट करावी लागत होती. आता दावरवाडी गावातून बस थेट बाजार मैदानात येऊ लागल्याने भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला असून, लांब पायपीट व गैरसोयीपासून मुक्तता झाली आहे.
या निर्णयामुळे दावरवाडी व पंचक्रोशीतील सामाजिक, धार्मिक व दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते किशोर (भाऊ) अशोकराव तांगडे यांचे आभार मानत, हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून संपूर्ण दावरवाडी गावाचा असल्याची भावना किशोर तांगडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच महामंडळ व प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.















