फर्जनच्या मृत्यूनंतर तिजोरीच्या चावीचे गूढ वाढले

Foto
मिटमिट्यातील साडेपाच कोटी घबाड प्रकरण : खजान्याची चावी वर्माकडे; पोलिस तपास संशयाच्या भोवऱ्यात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
: मिटमिटा येथील बाबा फर्जन यांच्या बंगल्यात सापडलेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्याप्रकरणी आता अनेक गंभीर प्रश्न आणि संशयाचे धुके निर्माण झाले आहे. बाबा फर्जन यांचा १३ जून रोजी मृत्यू झाल्यानंतर, ज्या खोलीत हा खजिना दडवला होता, त्या खोलीची चावी सुरेश वर्मा नामक व्यक्तीकडे होती. विशेष म्हणजे, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा खुद्द वर्मा यांनीच ही चावी पोलिसांच्या स्वाधीन केली आणि मृत्यूपूर्वी फर्जन यांनीच ही चावी आपल्याकडे सोपवल्याचा दावा केला. असे असतानाही पोलिसांनी मात्र फर्जन यांची पत्नी म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या आणि नंतर केवळ नोकर असल्याचे समोर आलेल्या शिलाबाई नामक महिलेलाच या प्रकरणात एकमेव आरोपी करून अटक केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार मोकळे राहून केवळ एका नोकर महिलेलाच बळीचा बकरा बनवले जात आहे का, अशी शंका आता उपस्थित होत आहे.
बाबा फर्जन यांच्या मृत्यूनंतर महिनाभर खोली बंद होती. या काळात खोलीत सापडलेल्या खजिन्यातून काही माल बाहेर गेला का, याचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला असून, त्याच्या फुटेजच्या आधारे आता सायबर
पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. खजिना असलेल्या खोलीत कोण कोण गेले होते, याचा शोध घेतला जात असून, जर काही ऐवज खोलीच्या बाहेर गेल्याचे निष्पन्न झाले, तर त्या व्यक्तीलाही या प्रकरणात आरोपी केले जाणार आहे.
फर्जनचे देवगिरी बँकेत खाते
पोलिसांनी जप्त केलेल्या ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांच्या रोकडमध्ये १००, २००, ५०, २०, १०, २ आणि १ रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. यातील १०० आणि २०० रुपयांच्या नोटा या २०१६-१७ सालच्या आहेत. त्या नोटांना लावलेले रबर बँडदेखील वितळून एकमेकांना चिकटलेले होते. त्यामुळे या नोटा नोटबंदीच्या काळात बदलून घेतलेल्या असाव्यात, असा संशय आहे. फर्जन यांचे देवगिरी बँकेत खाते असल्याचे आढळून आले आहे;
जर्मनीहून मागविले पैसे
पायाला जखम झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी स्वतःकडील कोट्यवधी रुपये न वापरता, जर्मनी येथे असलेल्या एका जवळच्या व्यक्तीकडून उपचारासाठी पैसे मागविले होते, अशी माहिती समोर आली आहे.
मंत्री शिरसाटांचे प्रश्नचिन्ह
फर्जन हा एकेकाळचा डॉन होता. त्याची छबी हिंदू नेता म्हणून होती. अनेक लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. मयत डॉनच्या घरी आढळलेले शस्त्रांचे परवाने अधिकृत आहेत. मयत झाल्यानंतर महिनाभराने पोलिसांकडून ही कारवाई का होते? सीसीटीव्हीचे फुटेज समोर आल्यानंतर आतली खरी बाब समजेलच, पण या तपासाला १८ तास का लागले ? पोलिसांना तपासाला एवढा वेळ का लागला? याची सर्व माहिती पोलिस आयुक्तांकडून घेतली जाईल, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र त्यात नेमकी किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
बेडसमोर सीसीटीव्हीचा स्क्रीन
फर्जन यांनी रोहिला गल्ली, सिटी चौक भागातून मिटमिटा येथील नवीन बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी त्यांनी स्वतः घरातील नोटांची बंडले, दागिने आणि ऐवज लोखंडी कोट्यांमध्ये भरून आणले. नवीन वास्तूत हे सर्व सामान बेडरूममध्ये
मुलांना चौकशीसाठी बोलावले
फर्जन यांची पहिली पत्नी १९९० साली त्यांना सोडून दोन मुलांसह पुण्यात निघून गेली. त्यानंतर शिलाबाई ही फर्जनसोबत राहत होती. शिलाबाईला ८ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. पुणे येथील फर्जन यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलांना छावणी पोलिसांनी सोमवारी (दि. १३) चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी (दि. १२) पोलिसांनी शिलाबाईला पुन्हा बंगल्यात नेऊन पाहणी केली असता पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागले नाही.
ठेवल्यानंतर, त्या कोट्यांमध्ये नेमके काय आहे, याची कोणालाही भनक लागू दिली नाही. शिलाबाईला घराच्या बाहेर जाण्याची किंवा मोबाईल वापरण्याची परवानगी नव्हती. फर्जन यांनी बेडसमोर सीसीटीव्हीचा स्क्रीन लावला होता, ज्याद्वारे ते संपूर्ण घरावर नजर ठेवून असत. शिलाबाई जरी बाहेर जाताना दिसली, तर ते जवळ दोरीने बांधलेली घंटी वाजवून तिला तत्काळ बोलावून घेत. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मुख्य गेटला नेहमी बाहेरून कुलूप लावलेले असायचे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhes Solutions