दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण , जाणून घ्या आजचे ताजे दर ....

Foto
मुंबई : दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे सोन्या-चांदीचे दर कोसळले आहेत. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने ३,६१७ रुपयांनी स्वस्त झालं, तर चांदीच्या दरात एकाच वेळी ३०,२३० रुपयांची मोठी घट झाली आहे.

आज सराफा बाजारात विना जीएसटी सोनं १,५३,०१२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं, तर चांदीचा दर प्रति किलो २,५२,२३२ रुपये इतका राहिला. जीएसटीसह विचार केल्यास, सोन्याचा भाव १,५७,६०२ रुपये आणि चांदी २,५९,७९८ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय प्लॅटिनमच्या दरातही ४,५६५ रुपयांची घसरण होऊन तो ६७,८९० रुपयांवर आला आहे.

विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण

बुधवारी विना जीएसटी चांदी २,८२,४६२ रुपयांवर तर सोनं १,५६,६२५ रुपयांवर बंद झालं होतं. सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर १,७६,१२१ रुपये होता, त्या तुलनेत सोनं आता २३,१०९ रुपयांनी स्वस्त झालंय. तसंच चांदी २९ जानेवारीच्या आपल्या ३,८५,९३३ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून १,३३,७०१ रुपयांनी घसरली आहे. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आले आहेत.

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोनं: ३,३१० रुपयांनी स्वस्त होऊन १,४०,१५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह याची किंमत १,४४,३६३ रुपये आहे.


१८ कॅरेट सोनं: २,७१० रुपयांच्या घसरणीसह आज १,१४,७५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह हा दर १,१८,२०१ रुपये इतका आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे भाव
२३ कॅरेट सोनं: ३,५९९ रुपयांनी घसरून १,५२,३९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,५६,९७० रुपये झाली आहे.

१४ कॅरेट सोनं: २,११४ रुपयांच्या घसरणीसह ८९,५१२ रुपयांवर उघडलं असून जीएसटीसह हे सोनं ९२,१९७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे.