औरंगाबाद: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी लोकमाता प्रतिष्ठान व पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने वाहन रॅली काढण्यात आली. यावेळी पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
रेल्वे स्टेशन रोडवरील कोकणवाडी चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चिकलठाणा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. लोकमाता प्रतिष्ठान व पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने जयभवानीनगर येथून वाहन रॅलीस सुरुवात झाली. ही रॅली विजयनगर, गजानन महाराज मंदिर परिसर मार्गे कोकणवाडी येथे गेल्यावर तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले,विकास जैन, विजय वाघचौरे, बाळ गायकवाड, लोकमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश डोळझाके, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वडकाते, उपाध्यक्ष कृष्णा चोरमाले, अनिल काळे, सचिन भुताळे, पोलिस बॉईज असोसिएशनचे रवि वैद्य तसेच सुनिला क्षत्रिय, माधुरी चौधरी, सुनीता राऊत आदी उपस्थित होते.