नवी दिल्ली - हनीट्रॅपच्या प्रकरणात भारतीय हवाई दलातील एका विंग कमांडरला अटक करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडित माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली पोलिसांची टीम या प्रकरणाचा अधिक तपास आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या संपर्कानंतर हा अधिकारी ङ्गहनीट्रॅपफमध्ये अडकल्याचं सांगितले जाते.
माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने पाठवलेल्या युवतीसोबत हा अधिकारी संपर्कात आला. सातत्याने युवतीने अधिकार्याशी संवाद साधून त्याचा विश्वास संपादन केला. सोशल मीडिया आणि ऑनलाइन संपर्काच्या माध्यमातून या अधिकार्याशी युवतीसोबत जवळीक निर्माण केली. त्यानंतर युवतीने त्याच्याकडून भारतीय संरक्षण यंत्रणेशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.आरोपी हवाई दलाच्या अधिकार्याने त्याच्या एका सहकार्याच्या मोबाईल फोनवर स्पाय सॉफ्टवेअर देखील इन्स्टॉल केले होते. ज्यामुळे पाकिस्तानी हँडलरला संवेदनशील माहिती सहजपणे मिळवता येत होती.
या प्रकरणात संबंधित अधिकार्याने नेमकी कोणती माहिती शेअर केली, ती माहिती किती संवेदनशील होती आणि ती पाकिस्तानमधील कोणत्या व्यक्ती किंवा यंत्रणेकडे पोहोचली याचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला दोन महिन्यांपूर्वी अटक केली. त्या अधिकार्यावर जषषळलळरश्र डशलीशीीं अलीं कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा संबंध पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या एका मोठ्या गुप्तहेर नेटवर्कशी असू शकतो असा तपास यंत्रणांना संशय आहे.
दरम्यान, हवाई दलाच्या अधिकार्याला ३१ मेच्या रात्री अटक करण्यात आली. अटकेपूर्वी भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला पोलीस कोठडीत घेण्यात आले आणि नंतर तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्यावर राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि वर्गीकृत माहिती उघड केल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकारी निगराणीखाली असून त्याला योग्य यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले आहे असं सांगत भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्याने या प्रकरणाला दुजोरा दिला.