गंगापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर रोडवरील विठ्ठल आश्रम येथे ह.भ.प. रामभाऊ राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. सांगता सोहळ्यानिमित्त काला कीर्तन, दहीहंडी तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी काला कीर्तन, दहीहंडी व महाप्रसादाला भाविकांची मोठी गर्दी; आमदार बच्चू कडू, खासदार संदिपान भुमरे यांची मुख्य उपस्थिती सांगता कार्यक्रमास आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू, खासदार संदिपान भुमरे यांनी उपस्थित राहून विठ्ठल आश्रमास भेट दिली.
यावेळी डोणगावकर, किरण पाटील कृष्णा पाटील डोणगावकर, नगराध्यक्ष संजय जाधव, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दिलीप निरपळ, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, वाल्मीक शिरसाट, राजेंद्र राठोड, सवर्णा जाधव, ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक नवनाथ कानवडे, दीपक साळवे, प्रशांत सदाफळ, डॉ. उद्धव काळे, यांची उपस्थितीते काला कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तीमय वातावरणात दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेतला. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित महाप्रसादात बेसनपोळी, वरण, आमरस आदी पदार्थांचा समावेश होता. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभघेतला. संपूर्ण सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन व हरिनामाच्या गजराने विठ्ठल आश्रम परिसर भक्तिमय झाला होता. सांगता सोहळ्यास परिसरातील भाविक, वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














