न्यायमूर्तीवरील महायोग प्रस्तावावरील स्वाक्षरीवरुन अमित शाहांनी लोकसभेतून उद्धव ठाकरना डिवचले !

Foto
नवी दिल्ली : तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या खासदारांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी (९ डिसेंबर) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापुढे सादर केला. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ सह १२४ अंतर्गत न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवावा अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. प्रस्तावाला इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये शिवसेनेचाही (उबाठा) समावेश आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

अमित शाह म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यापासून आजवर जे झालं नाही ते आज हे लोक (इंडिया आघाडी) करु पाहतायत. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात हे लोक महाभियोगाचा प्रस्ताव घेऊन आले आहेत. केवळ त्यांची मतपेढी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. त्या महाभियोगाच्या प्रस्तावावर या सगळ्यांनी (विरोधक) स्वाक्षरी केली आहे. त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख) त्यावर स्वाक्षरी केली आहे.

अमित शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, एका डोंगरावर, सर्वात उंचावर दिवा लावण्याबाबतचा निकाल त्या न्यामूर्तींनी दिला होता. त्याविरोधात हे लोक त्यांची मतपेढी वाचवण्यासाठी महाभियोगाचा प्रस्ताव घेऊन आले आहेत. देशातील जनता यांना माफ करणार नाही, जनता या विरोधकांना असल्या उद्देशांमध्ये मदत करणार नाही.

 दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या लोकसभेतील भाषणाचा काही भाग समाजमाध्यमांवर शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की ङ्गङ्घकोण होतास तू, काय झालास तू?

महाभियोग प्रस्तावावर कोणाकोणाची स्वाक्षरी

द्रमुकचे खासदार टी. आर. बालू, ए. राजा, कन्निमोळी, दयानिधी मारन, समाजवादी पक्षाचे अखिलेख यादव आणि डिंपल यादव, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, गौरव गोगोई आणि मणिकम टागोर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत, आययूएमएलचे ई. टी. मुहम्मद बशीर, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, व्हीसीकेचे तिरुमावलन यांच्यासह इतर काही खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.