शाहिद जवानांच्या कुटुंबियांना अमिताभ बच्चन यांच्याकडून मदतीचा हात; प्रत्येकी पाच लाख रुपये देणार

Foto
बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुरुवारी दुपारी ३:३० च्या दरम्यान जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने ३५० किलो स्फोटकांनी भरलेली कार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आदळली. यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सीआरपीएफ च्या ४४ जवानांना प्राण गमवावे लागले होते. . 
या घटनेनंतर देशभर प्रचंड संतापाची लाट उसळली असून अनेक बॉलीवूड कलाकारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेद नोंदवला आहे. शाहिद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची घोषणा केली आहे. हि मदत लवकरात लवकर शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.