कन्नड, (प्रतिनिधी) येथे राहणाऱ्या शेख यांच्या खात्यातून सायबर फसवणुकीतून ५ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. कन्नड पोलिसांनी ती रक्कम परत मिळवून त्यांच्या खात्यात जमा केली.
कन्नड शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे तक्रारदार शेख रफिक शेख रशीद, यांची सायबर फसवणूक करून त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आली होती. कन्नड कामगिरी पोलिसांची अवर्समध्ये तत्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवून घटनेची
माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि कुणाल सूर्यवंशी यांनी गोल्डन कार्यवाही सुरू केली. तपासादरम्यान फसवणूक झालेली रक्कम साऊथ इंडियन बँकमधील एका संशयित खात्यात वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधित खात्यातील रक्कम त्वरित होल्ड करण्यात आली.
ही रक्कम तक्रारदार यांना परत मिळण्यासाठी न्यायालयाकडून आवश्यक आदेश प्राप्त करून संबंधित पाठपुरावा बँकेकडे सातत्याने करण्यात आला. त्यानुसार तक्रारदार यांची संपूर्ण रक्कम ५ हजार रुपये १८ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या परत (रिफंड) करण्यात आली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कुणाल सूर्यवंशी, पोलीस विजय चौधरी, मंगला ठाकरे, कन्नड शहर पोलीस ठाणे यांनी पार पाडली.
कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि कुणाल सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले.












