जिल्ह्यात आज ७६ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
जिल्ह्यात आज ७६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १४४०३ वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या पाहिली तर १४४०३ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १०६०१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ३३२४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
ग्रामीण भागात ४३ रुग्ण
ग्रामीण भागात ४३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 
मुधळवाडी, पैठण -२, गुरूदेव सोसायटी बजाजनगर-३, साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव -२, नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव -१, संघर्षनगर, घाणेगाव-१, बोरगाववाडी, सिल्लोड-१, गांधी चौक, अजिंठा-४, काजी मोहल्ला, कन्नड -१, गोळेगाव, खुलताबाद -२, पवार वसती, बाबरा, फुलंब्री -५, गंगापूर-१३, बगडी, गंगापूर-१, काळे कॉलनी, सिल्लोड -१, आनंद पार्क, सिल्लोड-३, स्नेह नगर, सिल्लोड-१, शास्त्रीनगर, सिल्लोड -२ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
शहरातील ३३ रुग्ण
शहरात आज सकाळी आलेल्या पहिल्या टप्प्यात ३३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एन बारा, स्वामी विवेकानंदनगर, हडको-३, विनायकनगर-१, कोकणवाडी-१, जालाननगर-१, मुकुंदवाडी -३, शिल्पनगर -२, रमानगर -३, व्यंकटेश नगर -१, उत्तरानगरी-२, देवळाई रोड-१, बालाजीनगर-१, पुंडलिक नगर-३, शिवशंकर कॉलनी-३, ठाकरेनगर-२, मिलिट्री हॉस्पीटल -१, एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर-१, गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको-१, हडको-१, व्हिनस सोसायटी पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास-१, इतर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.